अखेर दगडूला मिळाली खऱ्या आयुष्यातील प्राजू, प्रथमेशनं दिली लग्नाची गुड न्यूज
मुंबई | ‘हम काले हुए तो क्या हुवा दिललावे है’ असं म्हणत ‘टाइमपास’मधल्या(Timepass) दगडून सर्वांची मन जिंकली. या चित्रपटात दगडू-प्राजूची एक सुंदर प्रेमकथा दाखवली गेली. या चित्रपटानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या मालिकेलीत कलाकारांनाही तेवढचं भरभरून प्रेम दिलं.
या चित्रपटातील दगडूची म्हणजेच अभिनेता प्रथमेश परबची(Prathamesh Parab) चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. त्याचे सोशल मीडियावरही दीड लाखांपेक्षा जास्त फाॅलोअर्स आहेत. अशातच त्याच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूड समोर आली आहे.
प्रथमेशला त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजू मिळाली आहे. तो लवकरच या प्राजूसोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाबाबत त्यानं इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे.
इस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये त्यानं हार हातात घेतलेला एक फोटो पोस्ट केला आहे. आमचं ठरलं आहे, लग्नाला यायचं ह म्हणत त्यानं पत्रिका गुरूवारी पाठवणार असल्याचंही सांगितलं आहे. त्याने अचानक लग्नाबद्दल पोस्ट करत चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला आहे.
तसेच त्यानं कॅप्शनमध्ये असंही लिहिलं आहे की, सगळेच विचारतायेत, विचार केला सांगूनच टाकू, गुरूवार पर्यंत काय ते कळ काढा. प्रथमेशच्या या पोस्टमुळं चाहत्यांना त्याची प्राजू कोण म्हणजेच नवरी कोण आहे, याचीही उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, नुकतीच मराठी कलाक्षेत्रातील अक्षया-हार्दिकनं लग्नगाठ बांधली आहे. त्या पाठोपाठ आता आणखी एक जोडपं लग्न करणार असल्याची चिन्ह दिसत आहेत
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.