बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPL 2021: सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं! ; DC VS SRH

मुंबई | आयपीएल हंगामातील 20 व सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला.मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर हा सामना खेळला गेला.हैदराबादला अखेरच्या षटकात 16 धावांची गरज होती. पण अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असताना हैदराबादला 15 धावा करता आल्या. त्यामुळे या सामन्याचा निर्णय अखेर सुपर ओव्हरने झाला.

सुपर ओव्हरसाठी हैदराबाद कडून केन विल्यम्सन आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर फलंदाजी करण्यास आला. तर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने चेंडू फिरकीपटू अक्षर पटेलकडे सोपवला.

अक्षर पटेल समोर डेव्हिड वॉर्नर – 0 धाव
अक्षर पटेल समोर डेव्हिड वॉर्नर– 1 धाव
अक्षर पटेल समोर केन विल्यम्सन – 4 धाव
अक्षर पटेल समोर केन विल्यम्सन – 0 धाव
अक्षर पटेल समोर केन विल्यम्सन – 1 धाव  (अक्षर पटेलने बाद झाल्याची अपील केली. थर्ड अंपायरने नॉट आऊट दिला. )
अक्षर पटेल समोर डेव्हिड वॉर्नर– 1 धाव    ( वॉर्नरने 2 धावा घेतल्या. पण त्यातली एक धाव वॉर्नरने शॉर्ट घेतली.)

दिल्लीकडून 1 षटकात 8 धावा करण्याच्या होत्या. कर्णधार रिषभ पंत आणि शिखर धवन फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. तर  डेव्हिड वॉर्नरने रशीद खानकडे चेंडू सोपवला.

रशीद खान समोर रिषभ पंत– 1 धाव
रशीद खान समोर शिखर धवन – 1 धाव (अंपायरकडून लेग बायचा इशारा)

रशीद खान समोर रिषभ पंत–  4 धाव(रिषभ पंतचा शानदार चौकार)

रशीद खान समोर रिषभ पंत – 0 धाव

रशीद खान समोर रिषभ पंत– 1 धाव (रशीद खानची अपील शेवटी थर्ड अंपर कडून नॉट आऊटचा इशारा)

दिल्लीला जिंकणयासाठी अखेरच्या चेंडूवर 1 धावांची गरज

रशीद खान समोर शिखर धवन – 1 धाव

अशा प्रकारे दिेल्ली काॅपिटल्सने हा सामना जिंकला. या सामन्याबरोबरच दिल्लीने अंकतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

थोडक्यात बातम्या-

केंद्रावर लस उपलब्ध आहे का याची खात्री करावी मगच केंद्रावर जावं- किशोरी पेडणेकर

“देशभरात फक्त 10 ते 15 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे”

“औषधांचा काळाबाजार आणि अफवा पसरवणाऱ्यांवर…”; योगी आदित्यनाथ यांनी घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More