बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर सुपर ओव्हरमध्ये दिल्लीची बाजी; केन विल्यम्सनची झुंज व्यर्थ

मुंबई | आयपीएल हंगामातील 20 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला.मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर हा सामना खेळला गेला.हैदराबादला अखेरच्या षटकात 16 धावांची गरज होती. पण अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असताना हैदराबादला 15 धावा करता आल्या. त्यामुळे या सामन्याचा निर्णय अखेर सुपर ओव्हरने झाला.

सर्वप्रथम नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीची सुरवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी फटकेबाजी करत 81 धावांची भागेदारी केली. पृथ्वी शॉ ने 53 धावा केल्या. तर शिखर धवन ने 28 धावा केल्या. कर्णधार रिषभ पंत आणि स्टीव्हन स्मिथ यांनी अखेर धावसंख्या 159 वर पोहचवली.

160 धावांचा पाठलाग करताना वॉर्नर लवकर बाद झाला. जॉनी बेअरस्टॉ आणि केन व्हिल्यम्सन यांनी चांगली भागेदारी केली. केन विल्यम्सनने अखेरपर्यंत झुंज दिली. त्याने 66 धावा केल्या. अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असताना हैदराबादला 15 धावा करता आल्या. आणि  अखेर या आयपीएल हंगामातली पहिली सुपर ओव्हर झाली

दरम्यान, सुपर ओव्हरसाठी हैदराबादकडून केन विल्यम्सन आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर फलंदाजी करण्यास आला. तर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने चेंडू फिरकीपटू अक्षर पटेलकडे सोपवला. या एका षटकात हैदराबादला केवळ 7 धावा करत्या आल्या. दिल्लीकडून 1 षटकात 8 धावा करण्याच्या होत्या. कर्णधार रिषभ पंत आणि शिखर धवन फलंदाजी मैदानात उतरले. तर  डेव्हिड वॉर्नरने रशीद खानकडे चेंडू सोपवला. रिषभ पंत आणि शिखर धवनने आरामात 8 धावा काढत सामना जिंकला. अशा प्रकारे दिेल्ली काॅपिटल्सने हा सामना जिंकला. या सामन्याबरोबरच दिल्लीने अंकतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

थोडक्यात बातम्या-

केंद्रावर लस उपलब्ध आहे का याची खात्री करावी मगच केंद्रावर जावं- किशोरी पेडणेकर

“देशभरात फक्त 10 ते 15 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे”

“औषधांचा काळाबाजार आणि अफवा पसरवणाऱ्यांवर…”; योगी आदित्यनाथ यांनी घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

इराकमध्ये अग्नितांडव! ऑक्सीजन सिलेंडर स्फोटात 82 रुग्णांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More