अखेर गोपीला मिळाला खऱ्या आयुष्यातला एहम

मुंबई| ‘साथ निभाना साथिया'(Sath Nibhana Sathiya) या स्टार प्लसवरील मालिकेनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या गोपीच्या भूमिकेला प्रचंड पसंती मिळत होती. मालिकेत गोपीची भूमिका देवोलिना भट्टाचार्जी(Devoleena Bhattacharje) या अभिनेत्रीनं साकारली होतं. त्यामुळं देवोलिनाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

देवोलिना सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावर 3 मिलियनपेक्षा जास्त फोलोअर्स आहेत. चाहत्यांना तिचा बाॅयफ्रेंड कोण आहे, याची प्रतिक्षा लागली होती, कारण काही दिवसांपूर्वी तिनं एका शोदरम्यान आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. परंतु ती व्यक्ती कोण आहे, याबाबत मात्र खुलासा केला नव्हता.

नुकतेच देवोलिनानं लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नुकतीच तिनं शहनवाज शेख या व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

शहनवाज शेख हा जीम ट्रेनर आहे. त्याची जीम देवोलिनाच्या घराजवळच आहे. या दोघांची भेटही जीममध्येच झाली होती, अशा चर्चा आहेत. हे दोघं जवळपास 2 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. नुकतीच त्यांनी लग्नगाठ बांधून एका नवीन प्रवासाला सुरूवात केली आहे.

शहनवाजचा स्वभाव खूप केअरिंग आहे,असं म्हणलं जात आहे. जेव्हा देवोलिनाचा अपघात झाला होता, तेव्हा त्यानं तिला धीर दिला होता. आणि अपघाताच्या धक्क्यातून बाहेर पडायला तिला मदत केली होती.

दरम्यान, देवोलिना आणि साथिया मालिकेत जीगरजी भूमिका साकारणारा अभिनेता विशाल सिंहच्या(Vishal Singh) अफेअरच्या चर्चा होत्या. परंतु त्या दोघांनी आम्ही चांगले मित्र आहोत, असं स्पष्टीकरण दिलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More