अहमदनगर महाराष्ट्र

नांदा सौख्यभरे! अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ!

अहमदनगर | समाजातील एखादी विधवा महिला असेल तर तिच्याकडे पाहण्याची नजर ही तिरकीच असते. विधावा म्हटलं की समाजातील काही समाजकंटक संधीचीच वाट पाहत असतात. मात्र वडाळा बहिरोबा इथल्या एका विधवा महिलेच्या लहान दीराने सर्वांना आदर्श घालून दिला आहे.

आपल्या मोठ्या भावाची पत्नी म्हणजे वहिनी लग्नाचे सात फेरे घेऊन घरात आली. त्यानंतर घरात पाळणाही हलला. मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. काळाने घात केला आणि त्यांचा पती म्हणजे मोठा भाऊ महेश मोटे यांचा अपघाती मृत्यु झाला.

प्रांजली असं संबंधित महिलेचं नाव असून तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र त्यांचा लहान दीर महेंद्रने पुढे येत आपल्या वहिनीशी लग्न करण्याच निर्णय घेतला. दोघांच्या होकारानंतर घरातील सर्वांची सहमती घेऊन त्यांचा विवाह आज पार पडला.

दरम्यान, महेंद्र आणि त्याच्या घरच्यांनी समाजातील लोक, गावकरी, मित्र आणि पाहुणेमंडळी काय म्हणतील?, असा कोणताही विचार न करता त्यांनी विवाह करत समाजाला एक आदर्श घालून दिला आहे. महेंद्र आणि प्रांजली या दोघांना पाहुणेमंडळी, वऱ्हाडीमंडळींनी आशिर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

थोडक्यात बातम्या-

“पीडित महिला संध्याकाळी घराबाहेर पडली नसती तर बलात्काराची घटना टळली असती?

कटकट बंद करा!; बिग बींच्या आवाजातील त्या काॅलरट्यूनविरोधात जनहित याचिका

“2024मध्ये काँग्रेसला एका बसमध्ये बसवून नेता येईल येवढेच खासदार मिळणार”

“राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी”

“छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही पण औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या