बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर कन्हैय्या कुमारांची राहुल गांधींना साथ, काँग्रेसमध्ये केला प्रवेश!

नवी दिल्ली | भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैय्या कुमार हे बऱ्याच दिवसांपासून काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आज या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. अखेर कन्हैय्या कुमार यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.

आज भगतसिंग यांच्या जयंती निमित्ताने कन्हैय्या कुमार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. यासोबतच गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या दोन तरूण नेत्यांमुळे काँग्रेस पक्षाला बळ मिळणार असल्याच बोललं जातय.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कन्हैय्या कुमार यांनी बिहार राज्यातील बेगुसराय या मतदार संघातून निवडणुक लढवली होती. मात्र, कन्हैय्या कुमार यांना पराभव पत्करावा लागला होता. कन्हैय्या कुमार हे गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात संघर्ष करत आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वी कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवानी यांनी राहुल गांधी यांच्यासोबत बैठक घेतली होती.

दरम्यान, या बैठकीबाबत गुप्तता ठेवण्यात आली होती. आमच्या या नव्या साथीदारांसोबत काँग्रेसचा आवाज बुलंद होणार आहे, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला म्हणाले आहेत. कन्हैय्या कुमार यांच्या काँग्रेसमधील पक्ष प्रवेशामुळे बिहार राज्यात काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

जर काँग्रेस वाचली नाही तर….’; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कन्हैया कुमार गरजला

21 कोटींची बोली लागलेल्या सुलतानने घेतला अखेरचा श्वास! मालक ‘बनीवाल’ करत होता तब्बल

‘इतका’ खर्च

दिल्लीचा विजयरथ अखेर कोलकाताने रोखला! कोलकाताचा दिल्लीवर धमाकेदार विजय

“जयंत पाटील आले, मात्र एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत”

“पुढची दहा वर्षे धनंजय मुंडेंना कोणीच हरवू शकणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More