अखेर राणा-अंजली अडकले लग्नाच्या बेडीत!
पुणे | ‘तुझ्यात जीव रंगला'(Tujhyat Jiv Rangla) या मालिकेनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी जोडी म्हणजे राणा-अंजलीची(Rana-Anjali). या जोडीला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिलं होतं.
आता छोटा पडदा गाजवलेले हे अक्षया(Akshaya Deodhar) आणि हार्दिक(Hardeek Joshi) रिअल लाईमध्येही नुकतेच लग्नबेडीत अडकले आहे. त्यांचा विवाह 2 डिसेंबर रोजी पुण्यात पार पडला आहे. त्यांच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
हे लग्न पारंपारिक पद्धतीनं पार पडलं आहे. दोघंही वधू-वरच्या लूकमध्ये फारच सुंदर दिसत होते. अक्षयानं लाल रंगाचा शालू परिधान केला होता. त्यावर नाकात नथ आणि नक्षीदार दागिनं घालून तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसेच हार्दिकनंही धोतर घालत पारंपारिक लूक केला होता.
सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस सुरू आहे.
दरम्यान, लग्नापूर्वीही अक्षया- हार्दिकनं हळद, मेहंदी, संगीताचे कार्यक्रमही अत्यंत धुमधडाक्यात केले. याचे फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
पडद्यावर राणा-अंजलीची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती. आता रिअल लाईमध्येही त्यांचा मॅरीड लाईफचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळं त्यांचे चाहतेही प्रचंड आनंदी आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.