बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांच्या घरातून ‘इतक्या’ लाखांची रोकड जप्त

मुंबई | काल दिवसभर संजय राऊतांची (Sanjay Raut) सक्तवसुली संचालनालयाकडून( ED) कडून चौकशी सुरू होती. त्यामुळे संजय राऊतांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. रविवारी सकाळी 7 वाजता ईडीने संजय राऊतांच्या विक्रोळी या निवास्थानी धाड टाकली. तिथे नऊ तास चौकशी झाल्यानंतर राऊतांची पुन्हा ईडी कार्यालयात चौकशी झाली. त्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास संजय राऊतांना ईडीने अटक केली.

ईडी चौकशीत  11 लाख 50 हजार रूपायांची रोकड सापडली आहे. दहा लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असं लिहिलं आहे. उरलेले दीड लाख रूपये आमचे असल्याचे राऊतांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. तसेच ईडीच्या ताब्यात असलेल्या काही कागदपत्रात वर्षा संजय राऊत (Varsha sanjay Raut) यांचा उल्लेख आहे.

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राऊतांनी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले मी बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक आहे, आम्ही लढत राहू. महाराष्ट्र आणि शिवसेना इतकी कमजोर नाही. महाराष्ट्र कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा, अशी टीका नाव न घेता राऊतांनी भाजपवर केली.

दरम्यान, पत्रा चाळ घोटाळा प्रकरण आणि 50 लाखांच्या व्यवहारामुळे संजय राऊतांच्या मागे ईडी लागली आहे. या प्रकरणी काल चौकशी झाल्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. सध्या संजय राऊतांना मेडीकल चाचणीसाठी जे,जे रूग्णालयात नेणार आहेत. तसेच राऊतांना आज कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. संजय राऊतांना अटक केल्याने काहीजण यावर टीका करत आहेत,तर काहीजण पाठिंबा देत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

थोडक्यात बातम्या-

सर्वात मोठी बातमी! संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं

“या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा”

मुख्यमंत्र्याचं सूचक वक्तव्य, लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार

‘राज्यपालांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही’, फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

“हे पार्सल आता उत्तराखंडला पाठवण्याची वेळ आलीये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More