अखेर शिंदेंनी सांगूनच टाकलं, फडणवीस सोडून स्वत: मुख्यमंत्री होण्याचं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) बंड करत शिवसेनेत(Shivsena) मोठी फूट पाडली. यानंतर शिंदेंनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या संख्याबळावर भाजपसोबत(BJP) सरकार स्थापन केलं आणि ते स्वत: मुख्यमंत्री झाले.

शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण संख्याबळानुसार भाजपचा(BJP) मुख्यमंत्री होईल असं सगळ्यांना वाटत होतं. मग शिंदे मुख्यमंत्री कसे झाले?, हा प्रश्न नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो.

एकनाथ शिंदेंनी ते मुख्यमंत्री कसे झाले याचं उत्तर एका वाक्यात दिलं आहे. एकदा शब्द दिला की मी मागे फिरत नाही. तो शब्द पाळलाच जावा हा माझा अट्टहास असतो. म्हणूनच मी मुख्यमंत्री झालो, असं शिंदे म्हणाले आहेत.

जनता आपल्याला निवडूण देते. त्यामुळं जनतेच्या हिताची कामे व्हावीत, लोकपयोगी कामे व्हावीत हाच माझा ध्यास आहे, असंही शिंदे म्हणाले.

दरम्यान, रविवारी ठाण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या(NCP) तब्बल 6 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. या निमित्तानं एकनाथ शिंदे बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या-