अखेर सिद्धार्थ-कियारा अडकले लग्नबेडीत; दोघंही म्हणतात आता आमची …
मुंबई | बाॅलिवूडमधील(Bollywwod) सर्वात लोकप्रिय कपल म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)आणि कियाराकडं(Kiara Advani) पाहिलं जातं. गेल्या अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळं ते लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडायचा.
अखेर मंगळवारी सिद्धार्थ-कियारानं लग्नगाठ बांधली. 7 फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेर येथे या दोघांचा विवाह अगदी थाटामाटात पार पडला. या लग्नाला काही बाॅलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती.
सिद्धार्थ-कियाराचे लग्न पार पडल्यानंतर अनेकांचा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. नेटकरीही कमेंट्सच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत.
सिद्धार्थ-कियारानेही लग्नाचे फोटो शेअर करत मजेदार कॅप्शन दिलं आहे. दोघांनीही सेम फोटो आणि सेम कॅप्शन दिलंय. फोटो शेअर कर त्यांनी लिहिलं आहे की, आता आमची पर्मनंट बुकींग झाली.
दरम्यान, सिद्धार्थ-कियारा ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटात त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती. प्रेक्षकांनीही या जोडीला पसंती दिली होती. अखेर रिअल लाईमध्येही ते दोघं एकत्र आल्यानं त्यांचे चाहते प्रचंड खुश आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.