बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भाजपमध्ये दरेकरांसारख्या नेत्यांचा….’; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच सुरेखा पुणेकर कडाडल्या!

पुणे | प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वादग्रस्त वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. त्यानंतर आज सुरेखा पुणेकर यांनी जाहीर प्रवेश केला.

आज गुरूवारी सुरेखा पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. मागील काही दिवसांपासून पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची सर्वत्र चर्चा सुरू होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून मला आनंद झाला आहे. माझं स्वप्न होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा. आज माझं स्वप्न पुर्ण झालं आहे. दरेकरांनी जे वक्तव्य केलं आहे, ते ऐकून मला वाईट वाटलं. दरेकारांनी असं बोलायला नको होतं. मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते, असं सुरेखा पुणेकर यांनी पक्षप्रवेश करताना म्हटलं आहे.

दरम्यान, सर्वच पक्षामध्ये लोक कलावंत आहेत. माझ्यासारखी महिला एवढ्या कष्टाने जर घडत असेल. दरेकरांच्या वक्तव्यामुळे लावणी क्षेत्रातील महिलांना अत्यंत वाईट वाटलं आहे. दरेकर यांच्यासारखे विरोधी लोक असं वक्तव्य करतात. हे खूप चुकीचं आहे. दरेकरांसारख्या नेत्यांचा भाजपमध्ये काहीच उपयोग नाही, असंही सुरेखा पुणेकर म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या –

मोठी बातमी! भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा रद्द; आलं ‘हे’ मोठं कारण समोर

पोस्ट ऑफिसमध्ये ‘हे’ खातं असेल तर मिळेल 2 लाखांचा फायदा!

पुरुषोत्तम खेडेकरांच्या युतीच्या भूमिकेवर भाजपकडून मोठी प्रतिक्रिया!

‘बिग बाॅस मराठी 3’ मध्ये झळकणार हे कलाकार?, संभाव्य नावं समोर

सलग दुसऱ्या दिवशी सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचा छापा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More