बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर सुयश आणि आयुषी अडकले विवाहबंधनात; पाहा फोटो

मुंबई | ‘का रे दुरावा’, ‘शुभमंगल ऑनलाईन’ यासारख्या मालिकांमधून लोकप्रिय झालेला अभिनेता सुयश टिळकने आयुषी भावेच्या वाढदिवसादिवशी चाहत्यांना खुशखबर दिली आहे. आयुषी आणि सुयशच्या मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम 20 ऑक्टोबरला पार पडला होता. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

सुयशने त्याच्या गर्लफ्रेण्डसोबत आज 21 ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे.

जुलै महिन्यात दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का देत साखरपुडा केला होता. त्यावेळी देखील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

आयुषी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशात सुयशसोबतच आयुषीनेही हळदीचे फोटो शेअर केले आहेत.

आयुषी भावे ही 2018 मध्ये महाराष्ट्राची श्रावणक्वीन किताबाची मानकरी ठरली होती.

थोडक्यात बातम्या-

‘मालदीव आणि दुबईमध्ये त्यांची…’; नवाब मलिकांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

बाॅलिवूडमध्ये पुन्हा खळबळ! ड्रग्ज प्रकरणी आता अभिनेत्री अनन्या पांडेला समन्स

सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे सेकंड हॅंड कारला आले ‘अच्छे दिन’

शाहरूख खान लेकाच्या भेटीला तर ‘मन्नत’वर एनसीबीचा छापा

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More