अखेर तेजस्विनीनं केला दुनियादारीच्या दिग्दर्शकासोबतच्या नात्यावर खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनं(Tejaswini Pandit) मराठी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं तेजस्विनीनं सर्वांची मन जिंकली आहेत. तिचा एक मोठा चाहता वर्ग आहे.

तेजस्विनीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि तिच्या लव्हलाईफबद्दल जाणून घेण्यास तिचे चाहते नेहमीच उस्तुक असतात. आता तेजस्विनी एका मुलाखतीत याबद्दल स्पष्ट बोलली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तेजस्विनीचं नाव ‘दुनियादारी'(Duniyadari) या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव(Sanjay Jadhav) यांच्यासोबत जोडलं जातं आहे. ते एकमेकांना डेट करत आहेत, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगत असतात.

आता तेजस्विनीनं एका शोमध्ये तिच्या आणि संजय जाधव सोबतच्या नात्यावर मौन सोडलं आहे. प्लॅनेट मराठीवरील ‘पटलं तर घ्या’ या शोदरम्यान तिला तिच्या आयुष्यातील वाईट अफवे विषयी विचारण्यात आलं.

यावर उत्तर देताना तेजस्विनी म्हणाली की, संजय जाधव आणि माझं अफेयर होतं ही माझ्यासाठी सगळ्यात वाईट अफवा होती. कारण संजय जाधव माझा दादा आहे. त्याचं आणि माझं नातं फार घट्ट आहे तो मला त्याच्या मुलीसारखं वागवतो, असंही तेजस्विनी यावेळी म्हटली.

दरम्यान, तेजस्विनी पंडीत एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण आता ती एक उत्तम निर्माती म्हणून देखील नाव कमवत आहे. नुकताच तिनं निर्मीत केलेला ‘बांबू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

महत्वाच्या बातम्या-