बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर 6 दिवस अडकलेलं महाकाय जहाज सुटलं; ‘इतक्या’ हजार कोटींचं नुकसान

कैरो | जगात सर्वात जास्त वाहतूक ही जलमार्गाने केली जाते. सुएझ कालवा हा  समुद्री मार्गासाठी एक प्रकारे नैसर्गिक वरदानच आहे. इजिप्तच्या या सुएझ कालव्यात गेल्या 6 दिवसांपासून एक महाकाय जहाज अडकलं होतं. अखेर सहा दिवसाच्या मेहनतीनंतर त्या जहाजाला बाहेर काढण्यात यश आलं आहे. जहाज बाहेर निघताच संपूर्ण जगाने सुटकेचा श्वास घेतला आहे. 

मंगळवारी सकाळी 7:30 च्या सुमारास ‘EVERGREEN’ नावाचं एक जहाज सुएझ कालव्यात अडकलं होतं. हे जहाज चीनवरून माल घेऊन नेदरलँडला जात होतं. परंतू समुद्राच्या जोराच्या वाऱ्यामुळं चालकाने जहाज दुसऱ्या बाजूला वळवलं आणि कालव्यात हे जहाज अडकून बसलं. सुएझ कालव्यात जहाजांना वाहतूक करण्यासाठी एकच निमुळता मार्ग आहे. त्यामुळे बाकीच्या जहाजांना या मार्गातून जाता आलं नाही. 

सुएझ कालवा म्हणजे 193.3 किमीचा चिंचोळा मार्ग आहे. या कालव्यातून एकावेळी एकच जहाज जाऊ शकतं. आशियाई आणि युरोपीय बाजारातील वाहतुकीचा हा महत्वाचा मार्ग आहे. या कालव्यातील वाहतूक थांबली तर जगाला एका तासाला 2800 कोटींचं नुकसान होतं. तर यात सुएझ कालव्यासाठी एकेकाळी मोठमोठी युद्धे देखील झाली होती. 

दरम्यान, सुएझ कालवा बंद झाल्याने 4 दिवसात जवळपास 400 जहाजांची वाहतूक बंद झाली आहे. तर दररोज 9.7 बिलियन डाॅलरच्या मालाची वाहतूक थांबली होती. 

थोडक्यात बातम्या-

“सपासप कोयत्याचा आवाज काळीज चिरत जातो, वाटते हे वार कोबीवर नसून आपल्याच छातीवर होत आहेत”

“मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही”

आमचं ठरलंच तर गेल्यावेळेस सारखं शपथविधी झाल्यावरच कळेल – चंद्रकांत पाटील

सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत

“शरद पवार-अमित शहांची भेट; नव्या पिढीला हे राजकारण समजणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More