बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून उघडणार चित्रपटगृहे

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असताना आता राज्य सरकार पुन्हा सर्व काही निर्बंध कमी करत असल्याचं दिसत आहे. काल राज्य सरकारने राज्यातील शाळा आणि प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील चित्रपटगृहे आणि सभागृहे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे आणि सभागृहे 22 ऑक्टोबर 2021 नंतर सर्व कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे नियमासह खुली करण्यात येणार आहेत. याबाबतच्या एसओपीचे काम सुरू आहे आणि लवकरच जाहीर केलं जाईल, असं मुख्यमंत्री कार्यलयाकडून सांगण्यात आलं आहे.

आज मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सचे सदस्य, खासदार संजय राऊत, अतिरिक्त मुख्य सचिव, चित्रपट कलाकार आणि चित्रपट निर्माते यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहे आणि सभागृहे उघडण्याचा जरी निर्णय घेतला असला तरी कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे.

दरम्यान, नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. तर येत्या 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

“ठाकरे सरकार टक्केवारीच्या फुगड्या खेळतंय का?”

आम्हाला पुन्हा संधी मिळणार, कधी ते सत्तेत तर… – देवेंद्र फडणवीस

UPSC Result | मराठवाड्याच्या विनायक महामुनीने देशात मिळवला 95 वा क्रमांक

UPSC Result | शेतकरी बापाचे कष्ट फळाला आले; सोलापूरचे शुभम जाधव साहेब झाले

“महाविकास आघाडी सरकारला राज्यात काय चाललय याचा थांगपत्ताच नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More