बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर मुहूर्त ठरला! उद्या दुपारी 4 वाजता बारावीचा निकाल होणार जाहीर

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. दहावीच्या निकालानंतर सर्वांनाच बारावीच्या निकालाची उत्सुकता लागून होती. अशातच आता महाराष्ट्र राज्य बोर्डाने अखेर बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे.

3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक देखील जाहीर करण्यात आले आहेत. ज्या संकेतस्थळांवर ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येतील त्या संकेतस्थळांची यादी देखील बोर्डाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने बारावीचा निकाल जाहीर होण्यास उशीर झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांचं मुल्यमापन करण्यात आलं आहे.

यंदाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचं मुल्यमापनामध्ये दहावीमधील कामगिरीवर 30 टक्के मार्क देण्यात आले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ठ गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात आला आहे.  त्यानंतर 30 टक्के गुण अकरावीच्या अंतिम परीक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारीत आहेत. तर उरलेले 40 टक्के गुण बारावीत घेण्यात आलेल्या सर्व परिक्षांच्या गुणांवर देण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या –

सावधान राहा! ‘हे’ पाच पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका, कारण…

‘ऑडिशनमध्ये निवड व्हावी म्हणून मी फोन सेक्स केला पण…’; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात असा असेल पाऊस?, वाचा हवामान खात्याचा अंदाज!

पुण्याला तातडीने शिथिलता देण्याचे आदेश काढावेत; महापौरांची राज्य सरकारकडे मागणी

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ‘या’ आक्रमक खेळाडूकडे दिली कर्णधारपदाची धुरा; विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठा बदल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More