बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवसापासून सुरु होणार ‘आयपीएल’चा थरार

मुंबई | जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलचा 14वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरु होईल, असं वृत्त एएनआयने दिेले आहे. आता फ्क्त आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत याला मंजुरी मिळायची बाकी आहे. 9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेची फायनल 30 मे रोजी खेळवली जाईल. आयपीएलच्या या वेळापत्रकावर पुढच्या आठवड्यात शिक्कामोर्तब होऊ शकतो.

आम्ही गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकींबाबत निर्णय घेत नाही. पण आम्ही 9 एप्रिलपासून स्पर्धेला सुरूवात करण्याचा आणि 30 मे रोजी फायनल खेळवण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत अंतिम निर्णय अजून झालेला नाही. पुढच्या आठवड्यात आयपीएलची ठिकाणं आणि वेळापत्रकाबाबत चित्र स्पष्ट होईल, असं गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याने सांगितलं आहे.

सुरुवातीला आयपीएलचं मुंबई-पुण्यात आयोजन केलं जाईल, असं बोललं जात होतं. पण महाराष्ट्रातल्या वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता, याबाबत शंका निर्माण झाली. यानंतर अहमदाबाद, चेन्नई, बँगलोर, दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत आयपीएलचं आयोजन करण्याबाबत बीसीसीआय आग्रही आहे, असं सांगण्यात आलं. मुंबईत सामने खेळवण्यासाठी आयपीएल अधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेटही घेतली.

दरम्यान, भारत-इंग्लंड सीरिजप्रमाणेच आयपीएलमध्येही 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाईल, असं सांगितलं जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई आणि अहमदाबादच्या टेस्टमध्ये 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली होती. मुंबईमध्ये मात्र स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळेल का नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही.

थोडक्यात बातम्या –

गँगस्टर अरूण गवळी होणार आजोबा, योगिता-अक्षयने दिली गुड न्यूज!

“असंच चालत राहिल्यास नोटेवरुन गांधीचा फोटो हटवून मोदी स्वत:चाच फोटो छापतील”

…म्हणून मी स्टंपच्या मागे मोठ्याने बडबड करतो, पंतने केला खुलासा, पाहा व्हिडीओ

‘तू काय ज्येष्ठ नागरिक आहेस का?’; कोरोनाची लस घेतल्यावर सैफ होतोय ट्रोल!

‘कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला…’; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More