बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर बहुप्रतिक्षित आयपीएलचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेपासून होणार उर्वरित सामने

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट मॅचचे 31 सामने स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. दरम्यान, 29 सामने झाल्यानंतर उर्वरित सामने स्थगित केल्यामुळे बीसीसीआयला याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार हे स्पष्ट झालं होतं.

आयपीएल स्थगित केल्यामुळे क्रिकेटप्रेमींमधुनही काही प्रमाणात नाराजीचा सूर उमटला होता. परंतु, काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने आयपीएल पुन्हा एकदा परदेशात खेळवले जाणार याबद्दल घोषणा केली. उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळविण्यात येतील, असं बीसीसीआयने स्पष्ट केल्यानंतर तारखांबाबत मात्र संभ्रम कायम होता.

आयपीएलच्या तारखांसंदर्भात एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. तसेच 15 ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी आयपीएलची सांगता होईल. बीसीसीआयकडून परदेशी खेळाडूंना एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये सुरक्षित नेण्यासाठी चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे.

त्याचबरोबर, इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने टी-ट्वेंटीच्या आधी खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता बीसीसीआय पुढे परदेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये आणण्याचं मोठं आव्हान आहे.

थोडक्यात बातम्या

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 150च्या खाली

आनंदाची बातमी! पुणेकरांचं कोरोना मुक्तीकडे पहिलं पाऊल, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

भर मंडपात नवरदेवाचे फाडले कपडे अन्…; व्हायरल झाला व्हिडीओ

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“लसीबाबत शंका उपस्थित करणारे भोळ्याभाबड्या बहीण-भावांच्या जीवनाशी खेळ करत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More