चंदीगड | प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मानसा येथे सिद्धूवर गोळी झाडण्यात आली असून या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
पंजाबमधील आप सरकारने काल 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोपर्यंतच सिद्धू मुसे वाला याची हत्या करण्यात आली. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात सिद्धू मुसे वाला याचा मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाले. आता या हत्येमागील कारण समोर आलं आहे.
घटनेच्या तीन तासांनंतर गँगस्टर गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी स्वीकारली. गोल्डी ब्रार हा कॅनडामध्ये आहे.
सर्व भावांना राम राम, सत् श्री अकाल, मूसेवालाच्या हत्येची आज, मी गोल्डी ब्रार, सचिन विश्नोई, लॉरेन्स बिश्नोई ग्रुप याची जबाबदारी घेतो. आमचा भाऊ विकी मिड्दुखेडा याच्या हत्येसाठी त्याने मदत केली होती. त्याचा बदला आम्ही आज घेतला आहे, असं गोल्डी ब्रारने फेसबुकवर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
महाविकास आघाडी सरकार अडचणीत?; काँग्रेसमुळे टेंशन वाढलं
“केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती भाजपवाल्यांना कशी मिळते?”, सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल
मोठी बातमी! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर
आनंदाची बातमी! मान्सून केरळमध्ये दाखल; राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
“आमच्या बापाची बदनामी होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही”
Comments are closed.