अखेर उर्फीनं केला पूर्ण कपडे न घालण्यामागचा मोठा खुलासा

मुंबई | राज्यात सध्या अभिनेत्री उर्फी जावेद(Urfi Javed) आणि भाजप(BJP) नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यावर आक्षेप घेत तिला बेड्या ठोकण्याची मागणी केली आहे. यावर उर्फीनंही प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांना सुनावलं होतं.

हा वाद आता राज्य महिला आयोगापर्यंत पोहचला आहे. उर्फीच्या कपड्यावरून चित्रा वाघ आणि रूपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांच्यातही जोरदार वाद-विवाद चालू आहे. त्यामुळं सगळीकडंच उर्फीच्या कपड्यावरून जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

त्यातच आता उर्फी जावेदनचं ती अशी अर्धवट कपडे का घालते याचा खुलासा केला आहे. उर्फीनं इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिनं अंगाला पुरळ आल्याचे फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत तिनं कपडे अर्धवट घालण्यामागचे कारण सांगितलं आहे. तिच्या अंगाला कपड्यांची अॅलर्जी आहे. तिनं पूर्ण कपडे घातले किंवा लोकरीचे कपडे घातले तर लगेच तिच्या अंगला पुरळ येतात, म्हणून ती पूर्ण कपडे घालत नाही, असं उर्फीनंच सांगितलं आहे.

आता उर्फीनं असा खुलासा करत सर्वांनाच बुचकळ्यात पाडलं आहे. उर्फीनं हे कारण सांगतिल्यानंतरही अनेकजण तिला कमेंट्स करत ट्रोल करत आहे.

महत्वाच्या बातम्या-