शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | बुधवारी संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2023-24 साठीचं बजेट सादर करत आहेत. यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी भारतातील आर्थिक स्थितीबाबत भाष्य केलं आहे. यावेळी 2024 च्या निवडणुकीचं लक्ष ठेवून हे बजेट सादर करण्यात आलं आहे.

याचदरम्यान निर्मला सीतारामण यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. या बजेटमध्ये कृषीक्षेत्रासाठी (Agricultural Area) मोठी तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नव्या स्टार्टअपला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. तरुण उद्योजकांद्वारे कृषी-स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी प्रवेगक निधीची स्थापना केली जाईल.

पशुसंवर्धन(animal husbandry), दुग्धव्यवसाय (Dairying) आणि मत्स्यव्यवसायासाठी (Fisheries) 20 कोटी लाखांपर्यंतचे कर्ज देण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. तरुण उद्योजकांद्वारे स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अ‌ॅग्रीकल्चर एक्सीलेटर फंड देण्यात येईल. शेतीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा देखील करण्यात येणार आहेत.

हैदराबादमधील (Hyderabad) ‘श्रीअन्न’ संशोधन संस्थेला केंद्र सरकारकडून मदत करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 63 हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार करण्यात आला आहे

महत्त्वाच्या बातम्या