बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने मोदी सरकारला झापलं, म्हणाले

नवी दिल्ली | देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे देशात ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड आणि आवश्यक त्या औषधांची कमतरता भासत आहे. या सर्व परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचं म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

कोरोना मृतांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. ही आपातकालीन परिस्थिती आहे. केंद्र सरकारने अशा परिस्थितीत लोकांची मदत करायला हवी. मात्र, केंद्र सरकार हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असल्याचं परकला प्रभाकर यांनी म्हटलं आहे. एका ऑनलाईन चर्चेदरम्यान ते बोलत होते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला धोरणात्मक सल्ला दिला होता. पण एका केंद्रीय मंत्र्याने तो असभ्य भाषेत धुडकावून लावला आणि त्यावरुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असं परकला प्रभाकर यांनी म्हटलंय

कोरोना संकटामुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. रुग्णालयात उपचार करावे लागत असल्याने लोकांनी साठवलेले पैसेही संपत आहेत. या आर्थिक नुकसानानंतर अनेक लोक पुन्हा उभे राहू शकत नाहीत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1.80 लाख लोकांचा जीव गेला आहे. मात्र, सरकार कोरोना रुग्णांचे खरे आकडे सांगत नाही. वास्तव परिस्थिती यापेक्षा भयानक आहे, असा आरोप परकला प्रभाकर यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मन की बात वेळीच समजून घेतली असती तर ही वेळ आलीच नसती”

‘येणार तर मोदीच’; मोदी सरकारवर केलेल्या टीकेला अनुपम खेर यांचं प्रत्युत्तर

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; 21 दिवसात रुग्णसंख्या निम्यावर

फ्रंटलाईन वर्कर्सच्या मदतीसाठी सलमान सरसावला; खाद्यपदार्थांची चव चाखत घेतला मदतकार्याचा आढावा

तारापुरात वायु गळती झाल्याची शक्यता; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More