नवी दिल्ली | केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तीकर कायदा ( 1961) अंतर्गत काही फाॅर्म भरण्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवली आहे. आजच सीबीडीटीने एक पत्रक काढून ही माहिती दिली. एकंदरीत सहा फॉर्मला मुदतवाढ देण्यात आली आहे.
30 जुन 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अधिकृत डीलरने सादर केलेल्या फॉर्म क्रमांक 15 सीसीमध्ये त्रैमासीक विवरण भरण्याची 15 जुलै ही पुर्वीची तारिख होती आता ती 31 ऑगस्ट असणार आहे. आर्थिक वर्ष 2020-21 फाॅर्म क्रमांक 1 मध्ये इक्विलायझेशन लेव्हा स्टेटमेंट दाखल करण्याची पुर्वीची तारीख 31 जुलै होती आता ती 31 ऑगस्ट असेल. आर्थिक वर्ष 2020-21 साठी फाॅर्म 64 सी ची पुर्वी तारीख 30 जुन होती ती आता 30 सप्टेंबर असेल.
आर्थिक वर्ष 2020-21 साठी फाॅर्म 64 डी गुंतवणुक निधीद्वारे जमा किंवा भरलेल्या निधीचा तपशील ( आयकर नियम 12 सेबीअंतर्गत भरणे) याची पुर्वीची तारीख 15 जुन होती आता ती 15 सप्टेंबर असेल. 30 जुन 2021 संपलेल्या तिमाहीत भारतात केलेल्या गुंंतवणुकीसंदर्भात पेंन्शन फंडाने केलेले स्टेटमेंट 31 जुलैपुर्वी सादर करायचे होते ते आता 15 सप्टेंबर पर्यंत करता येईल.
30 जुन 2021 रोजी संपलेल्या तीमाहीसाठी फाॅर्म 2 एसडब्ल्युएफ एक सार्वभौम संपत्ती निधीद्वारे केलेल्या गुंतवणुकीसंदर्भात 31 जुलै 2021 पुर्वी स्टेटमेंट सादर करणं गरजेचं होतं. ती मुदत आता 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे.या सुधारणांबरोबरच आयकर विभागाच्या इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या पोर्टलमध्ये पण दुरूस्ती केली आहे.
थोडक्यात बातम्या
यो यो हनी सिंगच्या अडचणीत वाढ; पत्नीनं दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार
नीरज चोप्राची धडाकेबाज कामगिरी; भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये एन्ट्री
कोरोनानंतर आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ; लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संक्रमण
वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण…- प्रविण दरेकर
‘माझ्या अंगावरून गाडी घाला’; पुण्यात भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा
Comments are closed.