बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्थिक दिलासा! कोरोना उपचारासाठी खर्च झालेल्या रकमेवर मिळणार इन्कम टॅक्स सवलत

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना मात्र रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा तुटवडा सध्या भासतोय. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा सगळ्या परिस्थितीत केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी रुग्णांची पिळवणूक थांबवण्याच्या दृष्टीनं अनेक उपाययोजना राबवल्या आहेत.

दुसऱ्या लाटेत कोरोनावरील उपचारासाठी खर्च झालेल्या रकमेवर इन्कम टॅक्समधून सवलत देण्यात येणार आहे. म्हणजेच ही रक्कम करमुक्त उत्पन्नात धरली जाणार आहे. त्यामुळं नागरिकांना करातून मोठी सवलत मिळणार असल्याची दिलासायक बातमी समोर येत आहे.

कोरोनामुळं एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर एखाद्या कंपनीनं किंवा मालकानं कोविड-19नं मरण पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना एक्स ग्रेशियाची रक्कम दिली असेल तर ती रक्कमही करमुक्त ठरेल. त्याचबरोबर एखाद्या कंपनीनं किंवा मालकानं आपल्या कर्मचाऱ्याचा कोविड-19 वरील उपचाराचा खर्च केला असेल, तर त्यांनाही या करसवलतीचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. केवळ वैयक्तिक करदरातच नव्हे तर संस्थात्मक करदात्यांनाही ही सवलत मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! 10 मिनिटांच्या अंतरात नर्सनं महिलेला दिले चक्क 3 लसीचे डोस

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

“अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेची समज नाही, म्हणून ‘कर्जाचे डोस’ देऊन काम चालू आहे”

“महाराष्ट्राची जनताच आता देवेंद्र फडणवीसांना संन्यास देईल”

कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यु नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More