पुणे महाराष्ट्र

कोरोनामुळं राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर, पण…- उद्धव ठाकरे

पुणे | पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. पण राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करत आहे. तसेच राज्य सरकारमार्फत जेवढी शक्य आहे तेवढी मदत आम्ही देत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवनात गुरुवारी बैठक झाली. या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबईत सुरुवातीच्या काळात सर्वाधिक रुग्ण वाढत होते. तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, तातडीने टास्कफोर्स स्थापन केल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे. तसेच वाढत्या रुग्ण संख्येमुळे काही गोष्टींची कमतरता होती. मात्र त्याची पूर्तता करण्यात आली आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये समन्वय पाहिजे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे पुण्याचेच आहेत. त्यामुळे स्वत: अजितदादाचं पुण्याच्या परिस्थितीवर लक्ष असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा, म्हणाले…

हार्दिक पांड्या झाला बाबा; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला इशारा, म्हणाल्या…

राष्ट्रवादीच्या आमदारानं शिवसेना नगरसेवक फोडले; सिन्नरमध्ये ‘पारनेर’ची पुनरावृत्ती!

ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस लाखमोलाची मदत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या