1 डिसेंबरपासून होणार ‘हे’ मोठे बदल, आजच जाणून घ्या

नवी दिल्ली | नवीन वर्ष सुरु व्हायला अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षात अनेक बदल होताना आपल्याला दिसतात. मात्र यावेळी थोडं वेगळं झालं आहे. डिसेंबर (December) महिन्याच्या सुरुवातीलाच देशात मोठे बदल होणार आहेत. जे तुम्हाला माहित असायलाच हवेत.

यामध्ये पेन्शन धारकांचे जीवनप्रमाणपत्र, सीएनजी, पीएनजी, एलपीजीचे दर, ट्रेनचे वेळापत्रक या सगळ्या गोष्टीत बदल होणार आहेत. यामुळे काही प्रमाणात पुन्हा सामान्य माणसाच्या खिशाला कात्री बसणार आहे.

तुम्हाला सरकारकडून पेन्शन (Pension) मिळत असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. लवकरच तुम्हाला 30 नोव्हेंबरपर्यंत तुमचं जीवनप्रमाणपत्र बँकेत सादर करायचं आहे. ते न केल्यास तुम्हाला सरकारकडून मिळणारी पेन्शन थांबू शकते.

सरकारकडून दर महिन्याला एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीचा आढावा घेतला जातो. त्यानुसार या सगळ्याचे दर निश्चित केले जातात. त्यामुळे आता आतंरराष्ट्रीय (International) बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ होणार आहे.

तुम्ही जर रोज ट्रेनने(train) प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहेे. थंडी आणि धुक्यामुळे डिसेंबर महिन्यातील अनेक रेल्वे गाड्याचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. त्यामुळे त्याकडे प्रवाशांनी लक्ष ठेवायचं आहे.

तसेच तुमची बँकेतील काही महत्त्वाची कामं असतील तर ती लवकर करुन घ्या. डिसेंबर महिन्यात बँकांना 13 दिवस सुट्टी असणार आहे. ख्रिसमस(Christmas), गुरु गोविंद सिंग जयंती, वर्षाचा शेवट यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या