बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि जाणून घ्या आपल्या पीएफ खात्यातील रक्कम

नवी दिल्ली | प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातून काही पैसे भविष्य निर्वाह निधीत जमा होते. मात्र आपल्याला जमा होणारी आणि आत्तापर्यंत जमा झालेली एकूण रक्कम माहिती नसते. मात्र आता ही रक्क्म आपल्याला सहज बघता येणारे आहे.

तुम्हाला EPFOकडे नोंदणी असलेल्या तुमच्या मोबाईलवरुन 011-22901406 या क्रमांकावर मिस्डकॉल द्यावा लागेल. त्यानंतर EPFO कडून तुम्हाला एक मेसेज पाठवला जाईल. त्यामध्ये तुमच्या पीएफ खात्याचा क्रमांक, नाव, जन्मतारीख, ईपीएफ बॅलन्स आणि एकूण जमा रक्कम अशी सगळी माहिती असेल.

गेल्या अनेक दिवसांपासून नोकरदारांचे डोळे लागून राहिलेले पीएफवरील व्याजाचे पैसे अखेर त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. हे पैसे ऑगस्ट महिन्यात नोकरदारांच्या खात्यात जमा होतील, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 ऑगस्टला हे पैसे नोकरदारांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या कोरोना संकटामुळे अनेकांची आर्थिक अवस्था बिकट झाल्याने भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने कर्मचाऱ्यांना एक नवी सुविधा देऊ केली आहे. त्यामुळे तुम्ही आता आजारपणाच्यावेळी गरज लागल्यास PF खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता. विशेष म्हणजे यासाठी रुग्णालयाचे बिलही सादर करण्याची गरज नाही.

थोडक्यात बातम्या-

‘मुंबई पोलिसांनी माझ्याकडे…’; गहना वशिष्ठचा खळबळजनक आरोप

“ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, आता ते कलेक्शन ऑफिस झालंय”

‘लोकांनी गोमांस अधिक खायला हवं’; ‘या’ भाजप मंत्र्याचं वक्तव्य

“तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील”

मन सुन्न करणारी घटना; आजीच्या दशक्रिया विधीदिवशीच नातवांचाही मृत्यू!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More