बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सात दिवसात कोरोना बरा, असा दावा करणाऱ्या कंपनीने जाहीर केली औषधाची किंमत, जाणून घ्या

नवी दिल्ली | कोरोनाने सर्व देशभरात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारीही कमी-अधिक प्रमाणात वाढत आहे. महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना वाढत असताना ऑक्सिजन, रेमडेसीविरचा तुटवडा असल्यानेही अनेकजण दगावले. त्यामुळे केंद्र सरकार शरीरातील ऑक्सिजनची कमतरता भरून निघेल या औषधांवर भर दिला आहे. अशातच झायडस कॅडिलाचं विराफिन हे  हे अँटिव्हायरल औषध उपलब्ध झालं होतं. या कंपनीने  औषधाचे दर जाहीर केले आहेत.

‘विराफिन’च्या एका डोसची किंमत 11,995 रुपये इतकी आहे, असं कंपनीने सांगितलं आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार कंपनीने हे औषध पाठवण्यास सुरुवात केली आहे. या औषधामुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज कमी भासेल असा दावा कंपनीने केला आहे.

केंद्र सरकारकडून झायडस कॅडिलाच्या ‘विराफिन’ औषधाला आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोना गंभीर रुग्णांसाठी ‘विराफिन’ औषधाला देशातील शिखर संस्था असलेल्या ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपात्कालीन मंजुरी द्यावी अशी मागणी कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे केली होती. डीसीजीआयने या औषधाला मंजुरी दिली आहे. आता या औषधाचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापर केला जाणार आहे.

दरम्यान, झायडस कॅडिला ही अहमदाबादमधील औषध कंपनी आहे. झायडस कॅडिलाचं इंटरफेरॉन अल्फा – 2 बी Interferon alpha-2b म्हणजे Virafin हे अँटिव्हायरल औषध. PegIFN म्हणूनही हे औषध ओळखलं जातं.

थोडक्यात बातम्या- 

कायदा बनला होता तेव्हा श्रेय घेणारे आज म्हणतात कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता- देवेंद्र फडणवीस

पुण्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ, वाचा आजची आकडेवारी

धोका वाढला! महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस आजाराचा दुसरा बळी, तर इतक्या रूग्णांवर उपचार चालू

संतापजनक! भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने महिलेला शेतात नेत केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

“कोरोनावर आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी मला जामीन देण्यात यावा”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More