बारामतीच्या ‘त्या’ रिक्षाचालकाच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर!
पुणे | बारामती शहरात रिक्षा चालवणाऱ्या बाबा कांबळे यांचा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा या लावणीवरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
बारामतीजवळच असलेल्या गुणवडी येथील रहिवासी बाबा कांबळे हे बारामती शहरात रिक्षा चालवतात. दोन-तीन दिवसांपूर्वी ते मालेगाव रस्त्यावर ऑटोमध्ये गॅस भरण्यासाठी गेले असताना लाईट नसल्याने काही वेळ थांबावे लागेल असं त्यांना सांगण्यात आलं मग आपल्या सहकाऱ्यांचं मनोरंजन करण्याच्या हेतूने त्यांनी लावणीवर ठेका धरला.
कांबळे यांचा नृत्याविष्कार पाहून तेथील लोकांना हे क्षण मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरता आला नाही. तिथे उपस्थित लोकांनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर बाबा कांबळे यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल होऊन हजारो लोकांपर्यंत पोहोचला.
बाबा कांबळे हे गुणवडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्यही आहेत आणि त्यांना कलेची विशेष आवड आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे बाबा कांबळे अत्यंत खुश झाले आणि आपण कधीही एवढी प्रसिद्धी मिळेल अशी अपेक्षा केली नव्हती अशा भावना व्यक्त करून यापुढेही संधी मिळाली तर आपण नक्कीच पूरेपूर प्रयत्न करू असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.
पाहा व्हिडिओ –
थोडक्यात बातम्या –
‘कृषी कायदे मागे घेऊन सरकारने माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी’; दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
पोलीस कर्मचाऱ्याच्या छळाला कंटाळुन पत्नीनंतर पतीनेही केली आत्महत्या!
“राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते”
राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारीही देखील अत्यंत धक्कादायक
पुणे पोलीस ‘अॅक्शन’मोडमध्ये! गजा मारणेला बेड्या ठोकल्यानंतर शरद मोहोळवर केली ही कारवाई
Comments are closed.