बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जाणून घ्या…महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून परिस्थिती आटोक्यात येतानाची चिन्हं दिसून येत नाहीत. त्यातच भर म्हणून महाराष्ट्रात आज 17 हजार 864 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 87 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एकुण 9 हजार 510 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले असून आज पर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या 21 लाख 54 हजार 253 एवढी झाली आहे.

एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 91.77 टक्यांवर आलं आहे. महाराष्ट्रात एकूण 1 लाख 38 हजार 813 सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आरोग्यमंत्र्यांनीही राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने आता तरी लोक नियमांचं पालन करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये अंशतः लाॅकडाऊन करण्यात आलेला आहे. तसेच, काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. परंतु, तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

पुणे विभागीय आयुक्तांना कोरोनाची लागण; नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन!

मोठी बातमी! पुण्यामध्ये कोरोना लस घोटाळा; तब्बल इतक्या हजार लसी गायब

सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत सामील!

सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ; तीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More