बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 3 हजार 11 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 1 हजार 94 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पुण्यात कोरोनामुळे 16 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

पुण्यात सध्या 538 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 32 हजार 494 इतकी आहे. तर 20 हजार 889 सक्रिय कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 5 हजार 33 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून आजपर्यंत 2 लाख 06 हजार 572 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 14 हजार 6484 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

अनिल देशमुख यांनी आता स्पष्टीकरण नाही तर राजीनामा द्यावा- देवेंद्र फडणवीस

बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी- अमृता फडणवीस

परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपामध्ये घेतलं शरद पवारांचं नाव; म्हणाले…

‘अनिल देशमुखांनी वाझेंना महिन्याला 100 कोटी जमा करायला लावले होते’; माजी मुंबई पोलीस आयुक्तांचा गंभीर आरोप

लाँच झालेल्या मेड इन इंडिया काॅम्पॅक्ट एसयूव्ही Skoda Kushaqचे जाणून घ्या फिचर्स

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More