बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 2 हजार 342 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 1 हजार 789 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पुण्यात कोरोनामुळे 17 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यातील 2 रुग्ण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 524 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 37 हजार 736 इतकी आहे. तर 23 हजार 62 सक्रिय कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 5 हजार 68 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून आजपर्यंत 2 लाख 09 हजार 606 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 11 हजार 890 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रातील लाॅकडाऊनचा येत्या 2 दिवसात निर्णय होणार; राजेश टोपेंचं मोठं स्पष्टीकरण!

“काँग्रेसचा चप्पल उचल्या प्रवक्ता सचिन सावंत जनतेतून कधी आमदार होऊ शकत नाही”

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर पुण्याच्या महापौरांचा ‘हा’ मोठा निर्णय

राष्ट्रवादी आक्रमक; परमबीर सिंह यांच्या संपत्तीबाबत केली ‘ही’ मोठी मागणी

दिवंगत सुशांत सिंग राजपूतच्या ‘छ‍िछोरे’ला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More