बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 3 हजार 594 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 2 हजार 165 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 31 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. 7 रुग्ण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 612 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,51,223 इतकी आहे. तर पुण्यात 29 हजार 983 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 161 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,16,079 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 16 हजार 799 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! ‘राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी’

‘या’ कारणामुळे महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त आहे का?- अतुल भातखळकर

धक्कादायक! मास्क न घालणाऱ्यांकडून करत होती वसुली, तेवढ्यात तीचं बिंग फुटलं!

माझा नाही तर कोणाचाच नाही! संतापलेल्या गर्लफ्रेंडने उचललं धक्कादायक पाऊल

…तर मग फडणवीसांनी जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा?- अमोल मिटकरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More