पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.
पुण्यामध्ये आज दिवसभरात 2 हजार 834 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 808 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पुण्यात कोरोनामुळे 28 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यातील 13 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.
पुण्यात सध्या 499 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 29 हजार 383 इतकी आहे. तर 18 हजार 888 सक्रिय कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 5 हजार 17 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून आजपर्यंत 2 लाख 05 हजार 478 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 12 हजार 625 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
विराटपेक्षा रोहितच लय भारी! संघाची सूत्र हाती आल्यावर निसटलेला सामना आणला खेचुन
‘मी नरेंद्र मोदी नसून फसवणार नाही, मी तुम्हाला…’; राहुल गांधींनी दिली ही पाच आश्वासनं
राज्यपालांकडे तक्रार केल्यानंतर पंकजा मुंडेनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
कोरोनावरील लसीचा ‘DNA’ वर परिणाम होतो का? आरोग्यमंत्री म्हणाले…
आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडही पाहायचं नाही- ममता बॅनर्जी
Comments are closed.