बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोणत्या महापालिका सध्या अनलॉकच्या कोणत्या स्तरामध्ये आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई | महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात लॉकडाऊन घोषित केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील कोरोना आता हळूहळू आटोक्यात येत असताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 5 स्तरांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दर आठवड्याला या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे. त्यानुसार आता या आठवड्यात महाराष्ट्रातील कोणती महापालिका कोणत्या स्तरामध्ये आहे ते जाणून घेऊया

अनलॉकच्या टप्प्यामध्ये नवीन बदलण्यात आलेल्या स्तरानुसार, पहिल्या टप्प्यात आता सोलापूर, औरंगाबाद, नागपूर या महापालिका आहेत. तसेच दुसऱ्या स्तरात ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, पुणे याबरोबरच तिसऱ्या स्तरामध्ये मुंबई, कल्याण, नाशिक, पिंपरी-चिंचवड यांचा समावेश या आठवड्यात असणार आहे.

सध्या अनलॉकनुसार अनेक ठिकाणी कोरोना परिस्थितीनुसार प्रशासनातर्फे नागरिकांना लॉकडाऊनमधून हळुहळू शिथिलता देण्यात येत आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी अद्याप संकट पूर्णपणे टळलेलं नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर ठेवणे गरजेचं असल्याचं सरकार व प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोसह निकृष्ट फीड देणाऱ्या कंपनीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

‘एकत्र आलेल्या राजांचं स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं; शिवसेनेचा खोचक टोला

कोरोना रुग्णांना आता ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या कोणता आहे हा आजार!

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णांसह नव्या बाधितांच्या संख्येत घट

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More