Top News मनोरंजन

सुशांत आत्महत्याप्रकरणी सीबीआयकडून 6 जणांवर गुन्हा दाखल

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतआत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयने हाती घेतला आहे. सीबीआयने या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती, रियाची आई संध्या चक्रवर्ती, वडील इंद्रजित चक्रवर्ती, सुशांत आणि रियाचा मित्र सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी यांच्याविरोधात एफआआर दाखल करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी बिहार सरकारने केंद्र सरकारकडे सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने ही शिफारस मंजूर करत सुशांत आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. त्यानुसार या प्रकरणी सीबीआयने तपास सुरु केला असून 4 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे. त्यानुसार ईडीसमोर 7 ऑगस्ट रोजी रियाला चौकशीसाठी हजर व्हावं लागणार आहे. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने गेल्या आठवड्यात रियाच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या विरोधात बिहारमधील पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर ही एफआयआर बिहारमधून मुंबईत हस्तांतरित करण्यासाठी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 5 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

“अयोध्येत मस्जिद होती, आहे आणि राहील सरकारने ताकदीच्या बळावर बदलला कोर्टाचा निर्णय”

“हवं तर तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो पण, यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा”

रियाने ब्लॉक केला होता सुशांतचा नंबर, कॉल डिटेल्स आले समोर

बीसीसीआयने आयपीएलच्या 13व्या सीजनसाठी चिनी मोबाईल कंपनीसोबत केलेला करार मोडला

‘मंदिर तोडणारे तुमचेच पूर्वज होते’; रिझवींनी असदुद्दीन ओवैसींना फटकारलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या