पालखीत अडथळा आणल्याप्रकरणी भिडेंसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा

पुणे | पालखी मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या संभाजी भिडेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या व्यवस्थापकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आलंय.

फर्ग्युसन रत्यावरुन पालखी जात असताना शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पालखीमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी घुसखोरी रोखण्याचं लेखी आश्वासन दिल्याशिवाय पालखी न हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पोलिसांकडून यासंदर्भात पालखी व्यवस्थापकांना लेखी आश्वासन देण्यात आलंय.

पोलिसांनी दिलेलं आश्वासन-

 

Deccan Police Letter - पालखीत अडथळा आणल्याप्रकरणी भिडेंसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या