मुंबई | ब्रिटनहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी केली जात आहे. तसेच या प्रवाशांना 14 दिवसांसाठी हॉटेल्स आणि इतर ठिकाणी क्वारंटाईन होणं सक्तीचं आहे. पण अनेकजण हे नियम धाब्यावर बसवत असल्याचं समोर आलंय.
बॉलिवूड अभिनेते सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान यांच्याविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून एफआयआर दाखल करण्यात आलाय. या तिघांनीही कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं असून, त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
अभिनेता सोहेल खान, अभिनेता अरबाज खान आणि निर्वाण खान हे तिघे 25 डिसेंबरला यूएईवरून मुंबईत दाखल झाले होते. परंतु त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवून थेट घर गाठल्यानं त्यांच्या विरोधात पालिकेनं तक्रार नोंदवली होती. अखेर त्या तक्रारीवरूनच पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
25 डिसेंबरला यूएईवरून हे तिघे मुंबईत परतल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी ताज लँडमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. परंतु त्यांनी 26 तारखेला या रुम रद्द करून त्यांनी घर गाठलं, त्यामुळे पालिकेने साथ नियंत्रण प्रतिबंधक कायद्यात अंतर्गत पोलिसात तक्रार केली. त्या तक्रारीवरूनच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
थोडक्यात बातम्या-
‘महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकाराल का?’; नाना म्हणाले…
औरंगाबाद नाही तर ‘या’ जिल्ह्याला संभाजी महाराजांचं नाव द्या- प्रकाश आंबेडकर
“शिवसेनेमुळेच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले हे लक्षात ठेवा”
“सत्तेच्या भुकेपायी भाजप राज्यपालपदाची प्रतिष्ठा कमी करत आहे”
कोरोनावर मात करत ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते डिसले गुरूजींनी दिला ‘हा’ कानमंत्र