अमरावती | राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती पूर्वी राज्यात कडक निर्बंध लावले होते. याशिवाय मास्क न लावल्यास कडक कारवाईचे आदेशही दिले आहेत. मात्र अशातच आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी शिजयंतीच्या दिवशी सगळे नियम धाब्यावर बसवत विना मास्क व विना हेल्मेट बुलेट सवारी केली. याच पार्श्वभूमीवर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा हे बुलेटवरुन जात असताना दोघांनीही मास्क घातलेला नव्हता. याचा व्हिडीओ खुद्द रवी राणा यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून पोस्ट केला होता.
जर लोकप्रतिनिधीच स्वत: अशाप्रकारे नियम मोडून सार्वजनिक ठिकाणी जात असतील तर ही बाब अत्यंत चुकीची असल्याचं सांगितलं जात होतं.
संपुर्ण राज्यात वाहनांवर प्रवास करत असताना प्रत्येकानं मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जे लोक मास्क लावत नाहीत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. आतापर्यंत अनेक लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. असं असताना शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाला जाताना नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही बुलेटवर गेले. पण त्यावेळी दोघांनीही मास्क आणि हेल्मेट घातलेलं नव्हतं. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना बंधनकारक असलेली नियमावली लोकप्रतिनिधींना नाही का?, असा प्रश्न विचारला जात आहे.
थोडक्यात बातम्या-
पल्लवी पाटीलचे बोल्ड फोटो सोशल मीडियात व्हायरल!
“खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला, शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं पाहिजे”
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक
FASTag मध्ये पैसे असतानाही टोलनाक्यावर स्कॅन नाही झालं तर… नक्की वाचा ‘हा’ मोठा नियम
‘माझा फोन टॅप होतोय…’; जितेंद्र आव्हाडांच्या त्या ट्वीटनं खळबळ