बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परवानगी नसातानाही ऑक्सिजनचा साठा करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई!

वाशिम | वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील हिंदुस्थान स्क्रॅप या दुकानातून 55 भरलेले आणि 9 रिकामे असे एकूण 64 ऑक्सिजनचे सिलेंडर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 26 एप्रिलला जप्त केले होते. याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक हेमंत मेतकर यांनी कारंजा शहर पोलीस स्थानकात 12 मे ला एफआयआर दाखल केली आहे.

कारंजा येथील रियाज अहमद गुलाम रसूल याच्या मालकीच्या हिंदुस्थान स्क्रॅप या दुकानातून 64 ऑक्सिजन चे सिलेंडर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून जप्त केले होते. सदर दुकानाला औषध परवाना नसतानाही ऑक्सिजन सिलेंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. हे ऑक्सिजन सिलेंडर कारंजा येथील जवाहर हॉस्पिटल यांच्या नावानं नागपूर येथील अमोहा ऑक्सी इंडस्ट्रीयल गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडून भरून आणल्याचं उघड झालं आहे.

जवाहर हॉस्पिटलचे डॉक्टर विजय जवाहर मालानी यांनी मी हे ऑक्सिजन सिलेंडर भरून आणण्याची ऑर्डर दिली नाही आणि याचे पैसेही भरले नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 10 एप्रिल 2021 च्या अधिसूचनेनुसार राज्यात कोरोनाचा संसर्ग पाहता ऑक्सिजनचा वापर फक्त वैद्यकीय कारणासाठी करण्याचे निर्देश आहेत. मात्र, जवाहर हॉस्पिटल यांची कोणतीही मागणी नसताना रियाज अहमद गुलाम रसुल हा विनापरवाना, अवैधरित्या इतर कारणासाठी वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर करत असल्यानं त्याच्या आणि सर्व संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी हेमंत मेतकर यांनी कारंजा शहर पोलीस स्थानकात 12 मेला एफआयआर दाखल केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18 क शिक्षा कलम 27, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7, साथीचा रोग कायदा 1897 चे कलम 2, 3 व 4, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे अवैधरित्या ऑक्सिजन सिलिंडर बाळगणाऱ्यांमध्ये भीती पसरली असून कुणीही ऑक्सिजन सिलिंडरचा गैरवापर करू नये असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! मुंबईत पुढील दोन दिवस कोरोना लसीकरण बंद

किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यंत्रणांना केलं अलर्ट

कोरोनाच्या भीतीने मदतीसाठी कुणीही आलं नाही; पोरांनी बापाचा मृतदेह हातगाडीवरून स्मशानात नेला

‘गुणरत्न सदावर्ते नीट बोल, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे’; संयमी विनोद पाटील भडकले

WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं, दिला हा गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More