बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तांडव वेब सीरिजच्या विरोधात लखनौमध्ये FIR दाखल

उत्तर प्रदेश | अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आलेली तांडव वेब सिरीज ही सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी या सिरिजवर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौवमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अनेकांनी या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या एका विशिष्ट भागावर आक्षेप घेतला आहे. हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याप्रकरणी हा एफआयआर भारतातील अॅमेझॉन प्राईमच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, वेब सीरिजचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकावर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येतं आहे.

सीरिज प्रकाशित झाल्यानंतर त्यामध्ये असलेल्या काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला होता. याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडेही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मंत्रालयानंही या कंटेंटबाबत अॅमेझॉन प्राईमला उत्तर देण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, याच सीरीजबाबत भाजप नेते राम कदम यांनीदेखील घाटकोपर पोलीस स्थानकात याविरोधात तक्रार दाखल केली होती.

थोडक्यात बातम्या-

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज होणार जाहीर!

…म्हणून ‘या’ गावात निवडणुकीचा निकाल पाहायला गावकरीच उरले नाहीत

“…त्याच गोस्वामी टोळीनं राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचं तोंड काळं केलं”

“शरद पवार यांच्या हृदयावरील ‘ही’ जखम भरून काढा”

‘2019 च्या सत्तास्थापनेची अजित पवारांशी नाही तर….’; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More