बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रावसाहेब दानवेंच्या मुलीविरोधात पोलिसांत तक्रार; शिवीगाळ, धमकी दिल्याचा सासूचा आरोप

मुंबई | केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं नाव त्यांच्या मुलीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दानवे यांची कन्या आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांच्याविरोधात औरंगाबादमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

तेजस्विनी रायभान जाधव या मुलगा हर्षवर्धन जाधव, सून संजना जाधव आणि नातवासोबत समर्थनगर (औरंगाबाद) राहतात. जाधव कुटुंबियातील कुरबुरींची अनेक वेळा चर्चा होते.

माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी गुरूवारी अचानक क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी सून संजना जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, घरगुती कारणावरून सूनेनं शिवीगाळ केली. त्याचबरोबर धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, दानवे यांनी चकवा दाखवत कन्नड पंचायत समितीचे सदस्य फोडल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. त्यांच्या आरोपामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

ट्रेंडींग बातम्या-

राज्यसभा उमेदवारीचा काँग्रेस-राष्ट्रवादीतील चौथ्या जागेचा तिढा सुटला

नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांच्या नावावर मोठा भ्रष्टाचार केला- तनुश्री दत्त

महत्वाच्या बातम्या-

सोन्याची लंका जाळायला भिभीषण आता आमच्याकडे आलाय- शिवराजसिंह चौहान

“कोरोनामुळे शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करावी”

मुनगंटीवारांची पलटी; आता म्हणतात ‘मी तसं म्हणालोच नाही’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More