बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक ‘वन अविघ्न पार्क’ला भीषण आग!

मुंबई | मुंबईतील लालबाग परिसरात इमारतीला भीषण आग लागली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे.

लोअर परिसरातील अविघ्न पार्क या इमारतीला ही आग लागली आहे. या घटनेत काही नागरिक जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता.

अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमी व्यक्तीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

शिल्पा शेट्टीचा नवा हेअर कट चर्चेत, पाहा व्हिडीओ

“तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे, वाचा एका क्लिकवर

“कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा”

समीर वानखेडेंची चौकशी करणार का?; दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More