बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्क आणि पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 14 जण जखमी

लखनऊ | गाझियाबादच्या एका कंपनीमध्ये भीषण आग लागून 14 जण जखमी झाले आहेत. या आगीदरम्यान केमिकल ड्रमचा स्फोट झाल्याने कंपनीचा काही भाग कोसळला आहे. गाझियाबादच्या या कंपनीत मास्क आणि पीपीई किट बनवले जातात.

मास्क आणि पीपीई किट बनवणाऱ्या या कंपनीत अचानक आग लागली आणि सर्वांची एकच तारांबळ उडाली. या आगीने काही वेळातच रौद्र रूप प्राप्त केल्यामुळे 14 जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. लिंक रोडच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये ही आग लागली असून साहिबाबाद आणि वैशाली अग्निशमन दलाच्या गाड्यांनी सध्या आटोक्यात आणली आहे.

दरम्यान या आगीमध्ये दोन महिला एका अल्पवयीन मुलासह 14 जण जखमी असून त्यापैकी चार लोकांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलं. मेडिकल इक्विपमेंट बनवणार्‍या कंपनीत आग नेमकी कशामुळे लागली? हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

आज-काल कंपन्यांमध्ये आग लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे कंपनीच्या मालकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचा काही अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच प्रत्येक कंपनीमध्ये फायर अलार्म बंधनकारक करण्यात आलेला असतानाही काही कंपन्या याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार करतात. आणि त्यामुळेच असे प्रसंग ओढवत आहेत.

थोडक्यात बातम्या –

संजना नाही तर आता ‘या’ माझ्या जोडीदार- हर्षवर्धन जाधव

मी मराठा म्हणून बोलत नाही; जगात जात हा प्रकार नसता तर…- उदयनराजे भोसले

“वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक आक्रमक आणि हिंसक होते”

चेअरमन, सोसायटीवर लक्ष ठेवा, अन्यथा…; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरीच्या आयुक्तांचा महत्त्वाचा इशारा

#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More