बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग, दोन जणांचा मृत्यू

मुंबई | भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला रात्री 12 च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय चालवलं जात होतं. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सध्या अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र ही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही.

या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, अग्निशमन दलाने उपचार घेत असलेल्या 76 रुग्णांना दोन शिड्यांच्या मदतीने बाहेर काढले. याच दरम्यान ही आग प्रचंड वाढली. त्यामुळे या आगीत अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

पोलीस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय करणार नाही- अजित पवार

“रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या”

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

राज्याच्या मुख्य सचिवांचा फोन टॅपिंग प्रकरणावरील अहवाल सादर, रश्मी शुक्लांवर कारवाई होणार???

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More