प्रसिद्ध गायकाच्या बिल्डिंगला भीषण आग, मोठी जीवितहानी…

Fire broke out in singer Shaan residentail building

Singer Shaan | बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक शान (Singer Shaan ) ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्या बिल्डिंगला मध्यरात्री भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने यात मोठी जीवितहानी टळली. कुणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.या घटनेची माहिती मिळताच तिथे अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यात आली.

यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेकांची सुखरूप सुटका करत अडकलेल्यांना घराबाहेर काढलं. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे येथील फॉर्च्यून एन्क्लेव्ह नावाच्या रहिवासी इमारतीमध्ये ही भीषण आग लागली होती.

गायक शान राहत असलेल्या बिल्डिंगला आग

इमारतीच्या सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही आग लागली. नंतर अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत ती विझवली. फायर ब्रिगेडच्या 10 गाड्या आणि जवान घटनेची माहिती मिळताच लगेच तेथे दाखल झाले.

यानंतर घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. याच इमारतीच्या 11 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक शान राहतात. ही आग लागली तेव्हा शान आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत घरातच होते, अशी माहिती आहे. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही वा वित्तहावी देखील झाली नाही. (Singer Shaan )

 

View this post on Instagram

 

A post shared by Shaan Mukherji (@singer_shaan)

मोठी जीवितहानी टळली..

प्राथमिक तपासानुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचले होते. यात सर्वजण सुखरूप आहेत. गायक शान यांचे कुटुंबीय देखील सुखरूप आहेत.

या वृत्तानंतर गायक शान (Singer Shaan ) यांचे चाहते देखील चिंतेत पडले होते. गायक शान यांना ‘गोल्डन वॉइस ऑफ इंडिया’ असं म्हटले जाते. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ही जाहिरातीसाठी जिंगल्स बनवण्यापासून केली. आज ते देशातील दिग्गज गायकांपैकी एक येतात. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी आपला आवाज दिला आहे.

News Title –  Fire broke out in singer Shaan residentail building

महत्त्वाच्या बातम्या-

‘मुलांना सांता नाही संत बनवा’, नितेश राणेंचं ट्वीट चर्चेत

“तुझाही संतोष देशमुख केला जाईल”; सत्ताधारी आमदाराच्या पुतण्यांना थेट धमकी

मुंडेंना पक्षातूनच मोठा धक्का, राष्ट्रवादीचा नेता अजित पवारांना म्हणाला ‘बंदोबस्त करून…’

इच्छापूर्ती ते नात्यात गोडवा, आज ग्रहमान ‘या’ राशींना देणार साथ!

‘छगन भुजबळांबद्दल अजित पवारांनीच मला…’, देवेंद्र फडणवीसांकडून मोठा खुलासा!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .