मुंबई | चेंबुरच्या माहुलगाव येथे पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये स्फोट होऊन आग लागली आहे. आज दुपारी 3 वाजून 3 मिनिटांनी ही आग लागली.
झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण माहुल-चेंबुरसह सायन परिसर हादरला आहे. आग लागल्यावर मोठं-मोठे स्फोट झाले. तेव्हा 5 ते 6 पर्यंत आवाज एेकू आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, आगीत 3-4 जण जखमी झाले आहेत. या व्यतिरिक्त आगीत कंपनीतील 200 ते 400 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवलं रक्तानं लिहिलेलं निवेदन!
-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!
-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!
-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!
-चित्रपटगृहामंध्ये जादा दर आकारल्यास इथे करा तक्रार