बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे हादरलं! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास घडली घटना आहे.  या घटनेत कोणालाही जखम झालेली नाही. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.

चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तूलातून गोळी झाडल्याची माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली आहे.

संशयिताने पिस्तूलातून गोळी झाडली. मात्र या घटनेत कुणी जखमी झाले नाही. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी चौकशी करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरीचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी दिलीये.

पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. अण्णा बनसोडे यांच्यावर ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोना रुग्णाला दारु दिल्यास तो बरा होता’; नगरच्या डाॅक्टरचा अजब दावा

आरोपीला अटक करुन नेताना नातेवाईकांकडून पोलीसांना जीवे मारण्याचा प्रयत्न!

भाऊ अन् पत्नीच बनले शत्रू; दीर-भावजयीनं मिळून केलेल्या कृत्याने पुणे हादरलं

4 मित्रांनी सरकारी मदतीची वाट न पाहता उभारलं 50 बेड्सचं कोविड सेंटर!

सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा- देवेंद्र फडणवीस

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More