बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिंदे-फडणवीसांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील उधारीचा माल”

मुंबई | शिवसेनेशी बंड करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेत मोठं शाब्दिक युद्ध सुरु आहे. कधी सभा, मेळावे आणि सामनाच्या अग्रलेखातून जोरदार शाब्दिक बाण शिवसेना सोडत आहे. तर दुसरीकडे विधानसभेच्या भाषणातून शिंदे गटाचे आमदार सेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या चुका सांगत आहेत. आता शिवेसेनेनं पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून शिंदें आणि फडणवीसांवर निशाणा साधलाय.

शिवसेनेनं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरले आहे. बाजारात नेहमी उधारी चालत असते. उधारी म्हणजे काय? तर माल आधी गिऱ्हाईकाने ताब्यात घ्यायचा व त्याचे पैसे दुकानदाराला नंतर द्यायचे. ती उधारी कधी कधी बुडवली जाते, असे आज सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. शिंदे फडणवीसांची वक्तव्य म्हणजे बाजारातील उधारीचा माल आहे, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं.

शिंदे फडणवीस यांचे सरकार येण्याने महाराष्ट्राचा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता महाराष्ट्राला काही कमी पडू देणार नाही. ते बुलेट ट्रेन आणतील, ईडीच्या चौकशा बंद करतील. त्या बदल्यात मुंबई आणि महाराष्ट्राचे तीन तुकडे शिंदे फडणवीस सरकारकडून करुन घेतील. मराठी माणसाचे खच्चीकरण आणि महाराष्ट्राचा विश्वासघात करतील.

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना गिळत होती, असा आरोप शिंदे गट करत आहेत. या पालुपदास अर्थ नाही. 2014 च्या भाजपसोबतच्या सरकारसोबत दुसरं काय घडत होतं. भाजपने दरवेळी शिवसेनेचे पाय छाटण्याचे आणि पंख कापण्याचे प्रयत्न केले. त्याच विद्रोहाच्या ठिणगीतून महाविकास आघाडी सरकारचा जन्म झाला, अशी तिखट आणि परखड मते आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मांडली आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘मंत्रीपदाची संधी मिळाली तर…’; विजय शिवतारेंचं मोठं वक्तव्य

पुढचे 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिवसेना आक्रमक; आणखी एका नेत्याची पक्षातून केली हकालपट्टी

शिंदे सरकारच्या खातेवाटपाबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More