बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बालिका वधू’ मालिका शाप ठरतेय का?, मालिकेतील ‘या’ तीन कलाकारांनी जग सोडलं!

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं अकाली निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धार्थ सर्व प्रथम लोकांच्या पसंतीस ‘बालिका वधू’ मालिकेतून आला होता. या मालिकेत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने सिद्धार्थ सोबत काम केलं होतं. प्रत्युषाने सिद्धार्थच्या पत्नीची म्हणजेच आनंदीची भूमिका साकरली होती. त्यासोबतच सुरेखा सिकरी यांचंही निधन झालं आहे. या मालिकेतील 3 बड्या कलाकारांचं निधन झाल्यामुळे ‘बालिका वधू’ मालिका शाप ठरतेय का?, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांनाच सुन्न करुन सोडलं आहे. अशातच ‘बालिका वधू’ मालिकेतील सर्वांची आवडती आणि लाडकी जोडी असणाऱ्या प्रत्युषा आणि सिद्धार्थचा अकाली मृत्यू झाल्याची चर्चा रंगली आहे. काही वर्षांपुर्वी प्रत्युषा बॅनर्जीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अशातच आता सिद्धार्थचा देखील मृत्यू झाल्याने बालिका वधूच्या लाडक्या जोडीचा अवघ्या कमी वयातच अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

या मालिकेमधील ‘दादी सा’ भूमिका करणाऱ्या सुरेखा सिकरी यांचंही 16 जुलैला 2021 ला निधन झालं होतं. दादीसाचं पात्र हे लोकांच्या घराघरात पोहोचलं होतं.   बालिका वधूच्या या आवडत्या जोडीची विशेष बाब म्हणजे आनंदी आणि शिव दोघांनीही ‘बिग बाॅस’ शोमध्ये धुमाकूळ घातला होता. प्रत्युषा बिग बाॅसच्या सातव्या सिझनमध्ये झळकली होती. मात्र ती शेवटपर्यंत टीकू शकली नव्हती. त्यानंतर सिद्धार्थ तेराव्या सिझनमध्ये झळकला होता आणि विजेतादेखील ठरला होता.

दरम्यान, लोकांच्या पसंतीस आलेल्या बालिका वधूच्या जोडीमधील आनंदीचा काही वर्षांपुर्वीच अंत झाला होता. त्यानंतर शिव अर्थातच सिद्धार्थ आणि बाॅलिवूड अभिनेत्री शेहनाज गिलची जोडी लोकांच्या पसंतीस आली होती. मात्र आता पुन्हा सिद्धार्थचा मृत्यू झाल्याने त्यांचे चाहते निराश झाले आहेत.

थोडक्यात बतम्या-

व्हाट्सअॅपचा मोठा दणका! भारतातील ‘तशा’ वापरकरत्यांची खाती केली बंद

…अन् मुलाने थेट कानशिलात लगावली; लखनऊ मुलीच्या व्हिडीओनंतर ‘या’ व्हिडीओचा धुमाकूळ

“मी एक भारतीय मुस्लीम, मला शासन असलेल्या धर्माची गरज नाही”

तालिबाननं काबूल विमानतळ केलं बंद; नागरिकांची देश सोडण्यासाठी धावाधाव

सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणी सस्पेंस वाढला! झोपेआधी घेतलेल्या गोळ्यांनी केला घात?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More